माचाळच्या विकासासाठी २५ लाख, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

लांजा तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण …त्याचबरोबर हिलस्टेशन अशी वेगळी ओळख असलेले माचाळ …माचाळला पर्यटकांची पसंती मिळत असली तरी त्यापरिसरात भौतिक गरजांची वाणवा होती. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी कड्याकपारीतून दगडधोंडे तुडवत माचाळला भेट दिली. त्यावेळी माचाळच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. माचाळ पर्यटन स्थळ विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माचाळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून त्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन खासदार विनायक राऊत यांनी निधीची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून २५ लाख रुपयांचा निधी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार विनायक राऊत यांना पत्राद्वारे कळवले आहे. शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत,आमदार राजन साळवी यांनीही प्रयत्न सुरु केले होते.