रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे यांचे आज निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई असा परिवार आहे. गेले काही दिवस मधुकर घोसाळे हे आजारी होते. ते निष्ठावंत शिवसैनिक होते. रत्नागिरी शहरातील शिवसेना पक्षबांधणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.

रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून मधुकर घोसाळे यांची ओळख होती. 2006 साली ते रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी विकासकामाचा धडाका लावला होता. स्वच्छता मोहिमेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. स्वच्छता कर्मचारी वेळेवर कामावर येऊन काम करत आहेत की नाही हे पहाण्यासाठी ते सकाळी सहा वाजता नगरपरिषदेमध्ये उपस्थित राहात. ते पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले