
रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोर कायम राहिला. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार आहे. गेले काही दिवस पावसाने पाठ फिरवली होती. मात्र पाऊस पुन्हा सुरु झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.63 मिमी तर एकूण 437.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 75.90 मिमी, दापोली 35 मिमी, खेड 23.80 मिमी, गुहागर 41.90 मिमी, चिपळूण 37. 10 मिमी, संगमेश्वर 28. 10 मिमी, रत्नागिरी 93.10 मिमी, राजापूर 38. 90 मिमी. लांजा 63.90 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 16 जुलै 2021 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरीकांनी सुरक्षितता आणि सावधानता बाळगावी असे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.




























































