रत्नागिरीत मान्सून सक्रीय, पावसाला जोरदार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोरदार सरीसह मान्सूनचे कोकणात आगमन झाले आहे. आज सायंकाळनंतर रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक उन आणि सायंकाळी आलेल्या युवांधार पावसामुळे नागरीकांची त्रेधातिरपीट उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. 11 आणि 12 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाचा वेग ताशी 30 ते 40 किमी असेल.

उकाड्याने हैराण झालेले नागरीक पावसाच्या प्रतिक्षेत होते. आज सायंकाळी पावसाने जोरदार आगमन केले. मुसळधार पावसामध्ये अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला. काही नागरीकांनी पाऊस थांबण्याची वाट पहात दुकानांचा आडोसा गाठला. पावसाच्या आगमनामुळे शेतकरीही आनंदित झाला आहे. 14 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.