Ratnagiri News – रत्नागिरीत पावसाची संततधार सुरुच, नाचणेत दरड कोसळली

रत्नागिरीत शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि संततधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नाचणे येथे दरड कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धूमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतीची पूर्वतयारीची कामे रखडली आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 103.99 मिमी पाऊस पडला.

तालुका निहाय पाऊस

मंडणगड-27.75 मिमी
खेड-94.28 मिमी
दापोली- 105.71 मिमी
चिपळूण – 99.22 मिमी
गुहागर-190.40 मिमी
संगमेश्वर 116.45 मिमी
रत्नागिरी -124.11 मिमी
लांजा – 128.00 मिमी
राजापूर – 50.00 मिमी