आठ लाखाचा दंड माफ करा, रत्नागिरी नगरपरिषदेची प्रदुषण महामंडळाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ज्या नगरपरिषदेने सॅनिटरी लॅण्ड फिलिंग उभारली नाहीत अशा नगरपरिषदेना महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाने दंड ठोठावला आहे.त्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेला आठ लाखाचा दंड ठोठावला आहे.मात्र रत्नागिरी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा विषय न्यायप्रविष्ठ होता.त्यामुळे सॅनिटरी लॅण्ड फिलिंग उभारण्यात झालेल्या विलंबाला नगरपरिषदेला जबाबदार धरता येणार नाही म्हणून हा दंड माफ करावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाकडे केली असल्याचे रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी दिली.

दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पासाठीच्या जागेचा निकाल लागला आहे.अडीच एकर जमिनीवर हा घनकचरा प्रकल्प उभारणार असून त्याच ठिकाणी सॅनिटरी लॅण्ड फिलिंग उभारण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी आजच्या नगरपरिषदेच्या सभेत खाऊगल्ली बाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.यापुढे एका व्यक्तीची एकच गाडी खाऊ गल्लीत लागेल.तसेच सर्व गाड्यांच्या नोंदी ठेवण्यात येतील.खाऊगल्लीतील गाडी कोणाच्यातरी नावावर आहे?ती कुणाला भाड्याने चालवायला दिली आहे? याबाबतच्या नोंदणी ठेवल्या जाणार आहेत.खाऊगल्लीत स्वचछता ठेवण्याबाबत सूचना देण्यात येईल.जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याकरिता रूग्णालयाच्या बाहेरील गाड्या आणि बसस्थानकाच्या बाहेरील गाड्या सुरू करण्यात येतील असे साळवी यांनी सांगितले.