INDvENG विराटसेनेची चिंता वाढली, शास्त्रींनंतर आणखी दोघांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. बरोबरीत असलेल्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. हा सामना सुरू असतानाच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

रवि शास्त्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर सपोर्ट स्टाफमधील अन्य तिघांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता क्वारंटाईन करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे सर्व मॅनचेस्टर येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीवेळी विराटसेनेसोबत नसतील.

INDvENG टीम इंडियामागील शुक्लकाष्ट संपेना, रोहित-पुजारा मैदानातून बाहेर

रविवारी रवि शास्त्री यांचा आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यात गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर आणि टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांचा समावेश होता. या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यानंतर भरत अरुण आणि आर. श्रीधर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.