का नाही मिळत चोरी झालेले मोबाईल? हे आहे कारण

47

सामना ऑनलाईन । मुंबई

आपला मोबाईल चोरी झाल्यानंतर तो आपल्याला पून्हा का मिळत नाही याचा विचार आपण कधी केला आहे का? पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिस मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न कतात, मात्र ते मोबाईलपर्यंत पोहचता येत नाही. याचे कारण आपल्या मोबाईल सोबत खेळला जाणारा खेळ. हॅकर्स आणि चोर अशा प्रकारे सहजरित्या मोबाईल बाजारात विकतात व याचा कोणालाही तपास लागत नाही. हॅकर्स चोरी केलेला फोन सुरुवातीला त्याचा इंटरनेशनल इक्विपमेंट आइडेंटिटी (IMEI) क्रमांक बदलतात, हे काम करण्यासाठी अवघे ५०० रुपये खर्च होतात. त्यामुळे हे फोन ट्रेस होत नाही आणि पोलिसांना याचा छडा लावण्यात कधी कधी अपयश येते.

चोरी झालेला मोबाईल सहज सेकंड हँड बाजारात विकला जातो. हॅकर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कोणत्याही स्मार्टफोनचा इंटरनेशनल इक्विपमेंट आइडेंटिटी (IMEI) क्रमांक बदलतात, यावर हा सगळा खेळ असल्याने हे मोबाईल ट्रेस होत नाही.

मोबाईल चोरीनंतर हे हॅकर्स व चोर आधी पॅटर्न अनलॅाक करतात व फ्लॅशर, ऑक्टोप्लस, वॉलकानो या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने IMEI  क्रमांक बदलतात. हॅकर्सला क्वालकॉम स्नैपड्रेगन प्रोसेसरवर चालणाअरे स्मार्टफोनचे  IMEI  क्रमांक बदलता येत नाही. हॅकर्स आणि आईटी इंजिनिअर  IMEI  क्रमांक बदलण्यासाठी फ्लॅशर सॉफ्टवेअरचा वापर करतात. या सॉफ्टवेअरचा  ऍपलच्या उत्पादनांवा फरक पडत नाही.  IMEI  क्रमांक बदलण्यासाठी याव्यतिरिक्त इतरही सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांच्या हँडसेटला वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. सॅमसंगच्या हैंडसेटसाठी ऑक्टोप्लस सॉफ्टवेअर आणि एचटीसीच्या मोबाईलासाठी वॉलकानो सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. हॅकर्स चाइनीज बनावटीच्या हँडसेटसाठी टर्बो, मिरॅकल, एसपीडी आणि बीएसटी यांसारखे सॉफ्टवेअर वापरतात.

आपली प्रतिक्रिया द्या