59 हजार मुंबईकरांची धावाधाव; मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा विक्रमी सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी 56 हजार मुंबईकरांची धावाधाव असेल. आशियातील सर्वात प्रतिष्ठत मुंबई मॅरेथॉनसाठी येत्या 21 जानेवारीला विक्रमी संख्येने मुंबईकर आपल्या धावण्याचे स्पिरिट दाखवण्यासाठी उतरणार असून 56 हजार प्रत्यक्ष शर्यतीत धावतील तर 2900 धावपटू अॅपद्वारे धावणार आहेत. एवढेच नव्हे तर पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावणाऱयांची संख्या 11 हजारांपेक्षा अधिक असल्याचीही माहिती आयोजकांनी दिली.

हिंदुस्थानातीलच नव्हे तर आशियातील सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱया धावपटूंची संख्या लाखाच्या असल्याचेही समोर आले आहे. मात्र इतक्या मोठय़ा संख्येने धावपटूंची सोय करणे कठीण असल्यामुळे सर्वच इच्छुकांना सहभागी करून घेणे शक्य नसल्यामुळे आयोजकांनी धावपटूंचा आकडा 56 हजारांवर रोखला आहे. मुंबईत जागोजागी भूमिगत मेट्रो तसेच पुलाचे काम चालू असल्यामुळे मॅरेथॉनच्या आयोजनात काही अडथळे निर्माण झाले आहेत. ते अडथळे दूर झाल्यावर धावपटूंचा आकडा निश्चित वाढला जाईल, अशीही भावना मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांकडून व्यक्त केली गेली आहे. यंदाच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय एलिट गट विजेतेपदासाठी गतविजेते इथिओपियाचा हेली लेमी बेरहानू आणि अँकियालेम हेमनोट हे जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहेत. मात्र त्यांना जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण यंदा मुख्य मॅरेथॉनमध्ये शेकडो जागतिक दर्जाचे धावपटू आपले वेगवान काwशल्य पणाला लावणार आहेत.

पूर्ण मॅरेथॉनमधील हिंदुस्थानी गटातील पुरुष आणि महिला विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस तसेच स्पर्धा विक्रम नोंदवल्यास प्रोत्साहन म्हणून दोन लाख रुपये दिले जाणार आहेत.