
बेताल बडबड करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने पुन्हा मोठा झटका दिला. अब्रुनुकसानीच्या खटल्यातील वॉरंट रद्द करण्याची विनंती नितेश राणेंच्या वकिलांनी केली. मात्र न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली आणि 30 जानेवारीच्या पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे सक्त आदेश नितेश राणेंना दिले. बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.



























































