इम्रान खान ड्रग्ज, सेक्समध्ये आकंठ बुडालेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार असतानाच त्याची पूर्वीची पत्नी रेहम खान हिने त्याच्यावर जबरदस्त बॉम्बगोळा टाकला आहे. तिने आपले आत्मचरित्रपर ‘ई बुक’ प्रसृत केले असून इम्रान खान हा मादक द्रव्ये, व्यभिचारात आकंठ बुडालेला असल्याचा आरोप केला आहे.

इम्रान खान याला ‘कुराण’सुद्धा वाचता येत नाही. त्यातच तो ‘ब्लॅक मॅजिक’सारख्या गोष्टींच्या आहारी गेलेला आहे, असा गौप्यस्फोटही रेहम खान हिने केला आहे.

स्वतःच्या अनैतिक संबंधांची कबुली इम्रानने आपल्याकडे दिली होती. आपणास अनैतिक संबंधातून पाच मुले झालेली असून त्यातील मोठय़ा मुलाचे वय ३४ वर्षे आहे. त्यातील काही मुले हिंदुस्थानी आहेत, असे त्याने सांगितले होते, असे तिचे म्हणणे आहे.