रिलायन्सने आणला जिओ गिगा टीव्ही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन सामना । मुंबई

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिओ मोबाईल आणि मोफत डेटा आणून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या रिलायन्स उद्योग समूहाने आता जिओ गिगा टीव्ही आणि जिओ फोन २ ची घोषणा केली. गिगा टीव्हीत मोबाईलचीही सुविधा असल्यामुळे यामुळे हिंदुस्थानींची टीव्ही पाहण्याची पद्धत बदलेल, असा विश्वास रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी व्यक्त केला.

रिलायन्स उद्योग समूहाच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी आज ही घोषणा केली. रिलायन्स जिओने इंटरनेट सेवा क्षेत्रात धुमाकूळ केल्यानंतर आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

काय आहे जिओ गिगा टीव्हीत?

-गिगा टीव्ही व्हाईस कमांड आणि रिमोटने सुरू करता येईल.
-गिगा टीव्हीमध्ये कॉलिंगचीही सुविधा आहे.
-एका गिगा टीव्हीवरून दुसऱ्या गिगा टीव्हीवर फोन लावता येईल.
-जिओ गिगा टीव्हीवरून मोबाईलवरही कॉल करता येईल.
-टीव्हीला व्हर्च्युअल रिऑलिटी हेडसेट लावल्यास ३६०अंशातील व्हय़ू पाहता येईल.

जिओ फोन २ ची वैशिष्टय़े
-येत्या १५ ऑगस्टपासून जिओ फोन २ बाजारात येणार आहे. पहिल्या जिओ फोनचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.
यात वॉट्सऍप, फेसबुक आणि यूटयूबही असेल.
-फुल क्वॉर्टी की पॅड, डय़ुअर सिम आणि लाऊड मोनो
स्पिकर असेल.
-नवीन फोन २,९९९ रुपयाला मिळेल. जुना जिओ फोन देऊन फक्त 501 रुपयात नवीन फोन घेता येईल.

सर्वात स्वस्त ब्रॉडब्रँड सेवा

जिओ गिगा टीव्हीबरोबरच जिओ गिगा फायबर ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्राँडबँड सेवा ११०० शहरांमध्ये सुरू करणार आहे. सर्वात स्वस्त जिओची ब्रॉडब्रँड सेवा असेल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले. ब्रॉडब्रँड क्षेत्रातही आता रिलायन्स जीओ आणि इतर कंपन्यांमध्ये स्पर्धा तीव्र होणार आहे. याशिवाय जीओ गिगा राऊटर, गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्स आणि गिगा टीव्ही कॉलिंग सेवेचीही घोषणा करण्यात आली.