कोरोनाविरोधात लढ्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mukesh-ambani

रिलायन्स इंडस्ट्रीकडून कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्सकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच रिलायन्सकडून दररोज एक लाख मास्क तयार करण्यात येत आहे.

रिलायन्स  व महानगर पालिकेने एकत्रितपणे सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 खाटाचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे. रिलायन्स फाऊंडेशनतर्फे विविध एनजीओला जेवण पुरवले जाणार आहे. महाराष्ट्र लोढीवली येथे आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.