
रिलायन्स जिओने आपल्या गीगाफायबर युझर्ससाठी नवीन जेटा व्हाऊचर्स लॉन्च केले आहे. जिओ गीगाफायबरच्या नव्या व्हाऊचरची किंमत 101 रुपयांपासून सुरू होत आहे. हे डेटा व्हाऊचर्स एका डेटा टॉप-अप प्रमाणे काम करणार असून याद्वारे युझर्स अतिरिक्त डेटा मिळवू शकतो. तुमच्या प्लॅनची वैधता संपल्यानंतर अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी या व्हाऊचर्सचा वापर करता येणार आहे.
जिओ फायबरच्या डेटा व्हाईचर्सची किंमत 101 रुपयांपासून ते 4001 पर्यंत असणार आहे. यात युझर्सला 2000 जीबी ते 2 टीबी पर्यंत डेटा मिळणार आहे. तसेच याच्या वैधतेबाबत बोलायचे झाल्यास जोपर्यंत तुमचा प्लॅन वैध आहे तोपर्यंत या व्हाऊचर्सची वैधता असणार आहे. जिओ फायबरचे युझर्स माय जिओ अॅपद्वारे किंवा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या डेटा व्हाऊचर्सने रिचार्ज करू शकणार आहेत.
टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार रिलायन्स जिओने पेड जिओफायबर युझर्ससाठी 6 डेटा व्हाऊचर्स लॉन्च केले आहेत. याची किंमत 101, 201, 501, 1001, 2001 आणि 4001 रुपये आहे. 101 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 20 जीबी डेटा, 201 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 55 जीबी डेटा, 501 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 125 जीबी डेटा, 1001 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 275 जीबी डेटा, 2001 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 650 जीबी डेटा आणि , 4001 रुपयांच्या व्हाऊचर्सवर 2000 जीबी डेटा मिळणार आहे.

उदाहरण म्हणून पाहिले तर तुम्ही 699 रुपयांचा जिओ फायबर प्लॅन घेतला असेल आणि तो 30 डिसेंबरला संपणार असेल तर तुम्ही दिलेल्या डेटा व्हाऊचर्सपैकी कोणत्याही व्हाऊचर्सची रिचार्ज करू शकता. याद्वारे तुम्ही अतिरिक्त जेटा मिळवू शकाल मात्र याची वैधता तुमच्या प्लॅनसह अर्थात 30 डिसेंबरला संपुष्टात येईल.





























































