#MeToo एम.जे.अकबर यांना रेणूका शहाणेने लगावला टोला

45

सामना ऑनलाईन । मुंबई

लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे नेते एम.जे.अकबर यांना प्रसिद्ध अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी टीका केली आहे. ‘एजे अकबर जर चौकिदार असतील तर देशातील एकही महिला सुरक्षित नाही’, असा टोला रेणूका यांनी लगावला आहे. मीटू या मोहिमेनंतर अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

अकबर यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांच्या मैं भी चौकिदार या मोहिमेत सहभागी असल्याचे ट्विट केले आहे. ‘मै भी चौकिदार या मोहिमेत सहभागी होताना मला अभिमान वाटत आहे. देशातील भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता, दहशतवाद हटविण्यासाठी तसेच नवीन हिंदुस्थान बनविण्यासाछी प्रयत्न करेन’ असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटला उत्तर देत रेणूका शहाणे यांनी ‘जर तुम्ही चौकिदार आहात तर देशात एकही महिला सुरक्षित नाही’ असा टोला त्यांना लगावला आहे. सोबत #BesharmiKiHadd असा हॅशटॅगही दिला आहे.

एम.जे.अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी पल्लवी गोगोई यांच्या सह 20 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे व बलात्काराचे आरोप लावले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या