नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगरच्या मुकुंदनगर भागात निवडणुकीच्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान आणि अपक्ष नगरसेविका खान मीनाज जाफर यांच्या कारकर्त्यांमध्ये तलवारीने हाणामारी आणि दगडफेक करण्यात आली आहे.

मुकुंदनगरमध्ये झालेल्या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये समद खान यांचे कार्यकर्ते मीनाज खान यांच्या घरावर हातात तलवारी घेऊन हल्ला करताना दिसत आहेत. त्या आधारे पोलिसांनी नगरसेवक समद खान यांच्यासह 4 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे तसेच दंगा करणे या कलमानुसार भिंगार पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.