राईस प्लेट महागली, ‘मेस’चे बजेट कोलमडले, विद्यार्थ्यांना पोटभर जेवण परवडेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेलनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडर महागले आहेत. या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य आणि किराणा मालाच्या किंमती कमालीच्या वधारल्या आहेत. याचा थेट फटका कँटिन, घरगुती खानावळी आणि मेस चालकांना बसला असून राईस प्लेटचे आणि मेसचे दर वाढले आहेत. परिणामी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे आणि कामगारांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे पोटभर जेवणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले.

सहा महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने बाढ होत गेल्याने खानावळ चालकांचे कंबरडे मोडले आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी त्यांना राइस प्लेटसह विविध खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत.

नोकरदारांना फटका

खानावळी, मेस, राइस प्लेट आणि पोळी-भाजीच्या वाढलेल्या दरांमुळे शिक्षण व नोकरीसाठी आलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांचा मासिक खर्च वाढला आहे. अल्प उत्पन्न गटातील कामगार, ऑटोचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी पोळीभाजी केंद्र हा मोठा आधार असतो. मात्र गॅस आणि पीठाचे दर वाढल्याने येथेही दरवाढ झाली आहे. पूर्वी 5 रुपयाला मिळणारी एक पोळी मासिक खर्चाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.