
झारखंडमधील हजारीबागमध्ये सोमवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर बसमधील सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बसचालक असदुल मुल्ला (वय 52 वर्षे), नूर जमाल (46 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर बसमधील गुरुपदोन मंडल (55 वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात बसमधील 30 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील सर्व लोक पिंड दान करण्यासाठी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरहून गया बिहारला जात होते.
गोरहर पुलाजवळ रस्त्यावर खड्डे पडल्याने पुढील वाहनाने ब्रेक लावल्याने भरधाव वेगाने जाणारी बस ट्रकवर मागून आदळली. पोलिसांनी तिन्ही मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत.




























































