
पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चोरलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी यवत परिसरात डोंगरावर वाट पाहत थांबलेल्या सराईताला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट तीनला यश आले आहे. त्याच्याकडून 2 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लकीसिंग गब्बरसिंग टाक (वय 20 रा. इंदिरानगर यवत ता दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खडकीत घरफोडी करणारा सराइत लकीसिंग टाक दागिने घेत यवतमधील पोरस डोंगरावर कोणाचीतरी वाट पाहत थांबल्याची माहिती पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संतोष शिरसागर, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, कल्पेश बनसोडे, प्रकाश कट्टे, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, भाग्यश्री वाघमारे, सोनम नेवसे यांनी केली.






























































