
मेलबर्न स्टेडियमवर रविवारी राष्ट्रगीत गाताना हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच भावुक झाला होता. राष्ट्रगीतातील ‘जय हे… जय हे…’ म्हणताना त्याच्या भावना अनावर झाल्या. पण त्याने डोळे बंद करून स्वतःला सांभाळले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकात प्रथमच हिंदुस्थानचे नेतृत्व करत आहे. गतवर्षीच्या विश्वचषकात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात मैदानात उतरली होती. त्यात प्रथमच वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखावी लागली होती.




























































