सिंघमच्या तिसऱ्या भागात दिसणार ज्युनिअर सिंघम, बालकलाकाराचे नाव गुलदस्त्यातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ सिनेमाच्या दोन्ही भागांच्या दमदार यशानंतर आता ‘सिंघम 3’ ची चर्चा सुरू झाली आहे. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. ‘सिंघम 3’ मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ दिसणार आहे. याबरोबरच या सिनेमात आणखी एक प्रमुख पात्र दिसणार आहे ते म्हणजे ज्युनिअर सिंघम. बाजीराव आणि अवनी यांचा मुलगा असणार आहे. त्यामुळे ही ज्युनिअर सिंघमची भूमिका नेमकं कोण साकारणार आहे हे अजून गुलदस्त्यातच आहे.

मिड डे च्या वृत्तानुसार, सुरुवातीला ज्युनिअर सिंघमच्या भूमिकेसाठी युग देवगणला कास्ट करण्याचा रोहीत शेट्टी याने विचार केला होता. मात्र ते वर्क झाले नाही. त्यांनी 8 ते 10 वयोगटातील तीन बालकलाकारांची निवड केली. त्यापैकी एकाची निवड करण्यात आली आहे. निर्मात्यांनी सिनेमाच्या बहुतेक भागांचे शूटिंग हैदराबाद येथे शेड्यूल केले आहे. त्यामुळे हा बालकलाकार नेमका कोण असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

या सिनेमामध्ये बाजीराव सिंघमचे बालपण पाहायला मिळणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आत्तासाठी तरी, रोहित शेट्टी यांनी त्याच्या पोलीस विश्वातील सर्व पात्रांच्या बौद्धिक संपत्ती (आयपी) हक्कांवर दावा केला आहे. 14 ऑक्टोबरला रोहीत शेट्टी यांनी सिंघमच्या सर्व पात्रांच्या आयपी अधिकारांवर दावा केला आहे. यामध्ये ज्युनिअर सिंघमचाही समावेश आहे. तसेच सिम्बा (2018) आणि सूर्यवंशी (2021) मधील संग्राम भालेराव आणि वीर सूर्यवंशी या पात्रांच्या IP अधिकारांवर दावा केला.