
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म आणि धर्मांतराविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘हिंदू धर्म कुणाचीही पूजेची पद्धत, प्रांत किंवा भाषा न बदलता व्यक्तीला चांगले वागण्याचे शिक्षण देतो’ असे म्हणत भागवत यांनी हिंदू धर्माची व्याख्या उपस्थितांसमोर मांडली आहे.
छत्तीसगड येथील मुंगेली जिह्याच्या मदकू भागात आयोजित ‘घोष शिबिरा’ते बोलत होते. हिंदू धर्म म्हणजे हरवलेले व्यवहाराचे संतुलन परत देणारा धर्म आहे. हा धर्म आपल्याला पर्यावरणासोबत योग्य व्यवहार करायला शिकवतो. तसेच पंथ-पूजा, जात-पात, जन्म-देश, भाषा भिन्न असतानाही एकत्र राहण्याची शिकवण देतो, असे स्पष्ट करून हिंदू धर्माला जगापर्यंत पोहचवायचे आहे. लोकांचे मतांतरण करायचे नसून त्यांना जगण्याची पद्धत शिकवायची आहे. सगळ्या जगापर्यंत हा धर्म पोहचवण्यासाठीच आपला जन्म हिंदुस्थानात झाल्याचेही भागवत म्हणाले.






























































