संपत्ती, अन्नधान्य लुटून इंग्रज श्रीमंत बनले, ब्रिटनने 16 कोटी हिंदुस्थानींचा बळी घेतला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशांनी हिंदुस्थानींवर भयंकर अत्याचार केले. संपत्ती, अन्नधान्य लुटले. हिंदुस्थानची तब्बल 45 ट्रिलियन डॉलर संपत्ती लुटून ब्रिटिश श्रीमंत बनले. 1880 ते 1920 या काळात ब्रिटनने 16.50 कोटी हिंदुस्थानींचा बळी घेतला. ब्रिटिश हे हत्यारे आहेत, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी ब्रिटनवर जोरदार हल्लाबोल केला.

रशिया-युक्रेन युद्धाला अकरा महिने होत आले तरी कोणताही तोडगा निघालेला नाही.  ब्रिटनकडून युक्रेनला रणगाडे आणि इतर शस्त्र्ापुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन संतापले असून, ब्रिटनने कशाप्रकारे हिंदुस्थानवर अन्याय केला होता याची माहितीच जगापुढे आणली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करताना ब्रिटनविरोधी पत्रक जारी केले. ब्रिटनविरोधी भूमिका घेताना रशियाने हिंदुस्थानचा आधार घेतला आहे. रिपब्लिक वर्ल्डने हे वृत्त दिले आहे.

रशियाने काय म्हटले?

  • ब्रिटनच्या वसाहतवादी धोरणांमुळे हिंदुस्थानचे खूप मोठे नुकसान झाले.
  • हिंदुस्थानची तब्बल 45 ट्रिलियन डॉलर इतकी प्रचंड संपत्ती ब्रिटिशांनी लुटली. केवळ संपत्तीच नाही तर अन्नधान्यही लुटून नेले होते.
  • 1880च्या दशकात हिंदुस्थानात मृत्यूदर एक हजार  लोकसंख्येमागे 37.2 होता. 1910 मध्ये 44.2 इतका झाला. या कालावधीत हिंदुस्थानींचे आयुर्मान 26.7 वर्षांपासून घटून 21.9 वर्षे इतके झाले.