
रात्रीच्या वेळेस गोदामांची भिंत तोडून साहित्य चोरून नेणाऱ्या चोरटय़ांना साकीनाका पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. इमरान शेख आणि अक्षय जगताप अशी त्या दोघांची नावे असून त्या दोघांकडून पोलिसांनी साडे पंधरा लाख रुपयाचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
अंधेरी पूर्वच्या साकीनाका येथे एक पंपनी आहे. त्या पंपनीच्या एका गाळ्यात मोबाईल आणि टीव्हीचे गोदाम आहे. रविवार असल्याने ते गोदाम बंद होते. रात्रीच्या सुमारास इमरान आणि अक्षय हे दोघे भिंतीवरून उडी टापून पंपनीमध्ये आले. गोदामांची भिंत तोडून ते आत शिरले. त्या दोघांनी गोदामातील मोबाईल, टीव्ही असा 15 लाख 68 हजार रुपयाचा ऐवज चोरून ते पळून गेले. सोमवारी सकाळी पंपनीचा कर्मचारी गोदामात आला. तेव्हा घरपह्डीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली.
साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त एम. व्ही रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील पोलिसांनी तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरून तपास करून इमरान आणि अक्षयला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी घरपह्डी केल्याची कबुली दिली.
महिलेला मारहाण करून मोबाईल चोरणारा गजाआड
रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करून तिचा मोबाईल चोरणाऱ्या सोनू वर्माला समतानगर पोलिसांनी अटक केली. तर सोनूचा साथीदार असलेल्या एका अल्पवयीन मुलाची रवानगी बालगृहात केली.
तक्रारदार या शुक्रवारी दुपारी कांदिवली पूर्वच्या दत्तानी पार्क येथून जात होत्या. तेव्हा मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी तक्रारदार महिलेचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. पण तक्रारदार यांनी विरोध केल्यावर त्या दोघांनी तिला बेदम मारहाण केली. मारहाण करून तिचा मोबाईल घेऊन ते दोघे पळून गेले. घडल्या प्रकरणी महिलेने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक आनंदराव हाके यांच्या पथकातील पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी 25 सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये पोलिसांना मोटारसायकलचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी बोरिवलीच्या राजेंद्र नगर पसिरातून सोनू आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघांनी मोबाईल चोरीची कबुली पोलिसांना दिली. सोनूला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाची रवानगी बालगृहात केली आहे. सोनू विरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात चार गुन्हे नोंद आहेत.
पवईत फळ विव्रेत्याची हत्या
पवईच्या तुंगा परिसरात राहणाऱ्या राजेश भारतद्वाज या फळ विव्रेत्याची हत्या झाल्याची घटना आज घडली. राजेशच्या हत्ये प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला असून तपासासाठी 2 पथके तयार केली आहेत.
राजेश हा पवईच्या तुंगा परिसरात राहतो. तो फळ विक्रीचे काम करत असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. सोमवारी रात्री राजेश हा रात्री दारू प्यायला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह विहार तलाव जवळ सापडला. याची माहिती स्थानिकांनी पवई पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पवई पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी राजेशची ओळख पटवून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. राजेशच्या हत्ये प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.



























































