दै. ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांना राज्य पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा-2018चा निकाल जाहीर झाला असून त्यात दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात शनिवार, 27 जुलैला होणाऱया बक्षीस समारंभात रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे.

स्पर्धेत पहिला क्रमांक आनंद बोरा (नाशिक), द्वितीय क्रमांक कृष्णा मासलकर (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक राहुल गुलाणे (यवतमाळ) यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थमध्ये वीरेंद्र धुरी (मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाळ बोरकर (हिंगोली) यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी राज्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 2100 छायाचित्रे पाठवण्यात आली होती.