सचिन तेंडुलकरने 14 वर्षापूर्वी नोंदवलेला अशक्यप्राय विक्रम आठवतोय का?

3454

विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक बलाढ्य विक्रम आहेत. कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्याच नावावर आहे. कसोटीमध्ये 51 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतकांची नोंद आहे. विक्रमांच्या या गाठोड्यात 14 वर्षापूर्वी सचिनने असाच एक विक्रम जोडला होता ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

14 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सचिनने जागतिक पटलावर नवीन विक्रमाची नोंद केली होती. 10 डिसेंबर, 2005 रोजी सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 35 व्या शतकाला गवसणी घातली आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या 34 कसोटी शतकांचा विक्रम मोडला होता. दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध सचिनने या अविस्मरणीय विक्रमाला गवसणी घातली. सचिनने यावेळी 177 चेंडूत 13 चौकारांसह शतक ठोकले होते.

sachin-tendulkar

गावस्कर यांचा कसोटीतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडल्यानंतर सचिनने मागे वळून पाहिलेच नाही. एकामागोमाग एक शतक ठोकत सचिनने शकतांचे अर्धशतक गाठले. कसोटीसह सचिनन एक दिवसीय क्रिकेटमध्ये देखील सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये मिळून सचिनने शतकांचे शतक साजरे केले.

sachin

श्रीलंकेविरुद्ध फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर 56 धावांमध्ये दोन बळी (गौतम गंभीर आणि राहुल द्रविड) गमावल्यानंतर सचिनने मैदानात पाऊल ठेवले. सचिनने चामिंडा वास, मुथय्या मुरलीधरन या सर्वोत्कृष्ट गोलंदांची पिसे काढते मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि शतक ठोकले. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेडमध्ये 15921 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 18426 धावांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या