दुबईत हिंदुस्थानीला लागली 8 कोटींची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो…’ ही म्हण सध्या दुबईत राहणाऱया एका हिंदुस्थानीच्या बाबतीत खरी ठरली आहे. 76 वर्षीय सफिर अहमद यांना 30.67 लाख दिरहम म्हणजे जवळपास 8 कोटी 26 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. सफिरसाठी हा आनंद खूप खास आहे. कारण ते गेल्या 33 वर्षांपासून रॅफल ड्रॉची तिकिटे खरेदी करत आहेत. तीन दशकांनंतर अखेर त्यांचे नशीब उघडले आहे. साफीर दुबईमध्ये फायर सेफ्टी सिस्टीम कंपनी चालवतात. जेव्हा त्यांना लकी ड्रॉ जिंकल्याबद्दल समजले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.