‘साहेब चषक’ डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबने जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेसावे गावातील शिवकर मैदानावर साहेब चषक मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा पार पडली. यावेळी झालेल्या पारितोषिक वितरणात समारंभाला  शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, परिवहनमंत्री, संसदीय कामकाजमंत्री, विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांनी खेळाडूंचे अभिनंदन तसेच खेळाविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरचे संस्थापक प्राचार्य अजय कौल, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, विधानसभा संघटक यशोधर (शैलेश) फणसे, समन्वयक देवेंद्र (बाळा) आंबेरकर, उपविभागप्रमुख राजेश शेटये, उपविभागप्रमुख हारुन खान, जागृती भानजी, शाखाप्रमुख सतीश परब, शाखाप्रमुख एकनाथ केरकर, शाखाप्रमुख सिद्धेश चाचे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आठ षटकांचा एक सामना अशी खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबने हरिविजय स्पोर्ट्स क्लबला हरवून विजेतेपदला गवसणी घातली आणि रोख पारितोषिक 31,059 रुपये व साहेब चषक आणि सर्वोत्तम संघाचा मान पटकावला. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हरिविजय स्पोर्ट्स संघाचा जिगरबाज खेळाडू ज्यांनी सर्वांची मने जिंकली असा स्वप्नील भोंडे यास इलेक्ट्रिक स्कूटर आणि साहेब चषक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी 5000/- रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले.