
हिमालयाप्रमाणेच सह्याद्रीच्या दऱयाखोऱयांमध्येही अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. कोल्हापुरातल वनस्पती शास्त्रज्ञांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध लावला आहे. त्या वनस्पतीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले आहे. यापुढे ती वनस्पती ‘अर्जिरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाणार आहे.
डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड हे कोल्हापुरातील वनस्पती शास्त्रज्ञ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळणाऱया विविध वनस्पतींचा अभ्यास करतात. नुकतीच त्यांनी गारवेल कुळातील दुर्मिळ वनस्पती शोधून काढली. त्या वनस्पतीला त्यांनी ‘अर्जिरिया शरदचंद्रजी’ असे नाव दिले. शरद पवार यांचे कृषी क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे. त्यामुळेच त्यांचे नाव या वनस्पतीला दिल्याचे हे शास्त्रज्ञ सांगतात. डॉ. शिंपले हे गेली वीस वर्षे गारवेल कुळातील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. आतापर्यंत त्यांनी या कुळातील विविध पाच नव्या वनस्पतींचा शोध लावला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱया दुर्मिळ वनस्पतीचा शोध डॉ. शिंपले आणि डॉ. लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. ही वनस्पती आता ‘अर्जिरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळकली जाईल. दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार




























































