
साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साईसंस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे. अशी माहिती संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली
शिवा शंकर म्हणाले की ,साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साईसंस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे. यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक आरत्या व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थान युनीक आयडी कार्ड बनणार आहे. यापूर्वी साईसमाधीवर शाल टाकण्यासाठी सोडत पद्धत अवलबंण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत संस्थान विचार करत आहे. या शिवाय देशभरातील साईमंदिराची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही साईसंस्थानचा विचार सुरू आहे असे ते म्हणाले.
साईमंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रूग्णांना मोफत देण्यात येणार आहे. येथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रूग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल लिहीलेले असेल असेही ते म्हणाले.
काल एका माजी नगरसेवकाने भाविकांना पास विकण्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानने पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पोलीस मंदिर परिसरात फिरणाऱ्या व भाविकांची दिशाभुल करणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन कारवाई करणार आहेत. वारंवार कुणावर कारवाई झाली तर त्याच्या हद्दपारीसाठी जिल्हाधिकारी व पोलीसांना संस्थानकडून पत्र दिले जाणार आहे. आरती व दर्शन पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीचे सशुल्क पासेससाठी शिफारस करतांना यापुढे सर्व भाविकांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर द्यावे लागणार आहेत. पासेस कन्फरमेशनबाबत संबधित भाविकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकींग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे.




























































