
कोरोना काळानंतर श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले. गेल्या 11 महिन्यांत साईचरणी तब्बल 398 कोटी रुपयांचे दान अर्पण करण्यात आले, तर गेल्या अकरा महिन्यांत तब्बल दीड कोटीपेक्षा जास्त भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. दानपेटी, देणगी काउंटर, ऑनलाइन देणगी, चेक, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे दान साईसंस्थानला प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या 398 कोटींपैकी दानपेटीत 169 कोटी, देणगी काउंटर 78 कोटी, ऑनलाइन डोनेशन 73 कोटी 54 लाख, चेक आणि डीडी 19 कोटी 68 लाख, डेबिट, क्रेडिट कार्ड 42 कोटी, मनिऑर्डर 2 कोटी 29 लाख रुपये, सोने 27305.450 ग्रॅम, चांदी 356305.470 ग्रॅम यांचा समावेश आहे.






























































