हो! शिंदेंसोबत जाऊन भाजपने चूकच केली; सर्वपक्षीय समर्थकांचं स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेसोबत गद्दारी करून पक्षातून बाहेर पडलेल्या 40 आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडवले. या सत्तांतरावरून जगभरात चर्चा झाली. भाजप व एकनाथ शिंदे गटाने खेळलेल्या या खेळीवरून त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. ही युती बेकायदेशीर, घटनाबाह्य असल्याची टीका त्यांच्यावर झाली आहे. याबाबतचे एक सर्वेक्षण नुकतेच सकाळ साम कडून करण्यात आले असून त्यातून सर्वपक्षीय समर्थकांचा सूर हा भाजपविरोधात असल्याचे समोर आले आहे.

सकाळ सामकडून सर्वपक्षीय समर्थकांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यात मात्र शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करून चूक केली का? असा सवाल करण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करून चूक केली असल्याचे मत 57.5 टक्के लोकांनी व्यक्त केलं. याचा अर्थ अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना ही भाजपची चूक असल्याचे मान्य केले आहे. तर 31.9 टक्के लोकांना ही भाजपची चूक वाट नाही तर 10.6 टक्के लोकांनी ते नेमकं सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे.