साखरपा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा कायम, सलग सातव्यांदा 9-0 ने बाजी मारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना शिवसेना पुरस्कृत पॅनेल पुढे एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे साखरपा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून थेट सरपंचासह नऊच्या नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

नवोदित तरुण उमेदवार शिवसेना पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली. यामध्ये थेट सरपंच पदासाठी रुचिता निलेश जाधव, प्रभाग 1 मधून सुमित संतोष वाघधरे, रश्मी रवींद्र साळसकर, गजानन दत्ताराम पवार, प्रभाग 2 मधून आस्मी आशिष कुरूप ,श्रद्धा अविनाश सकपाळ, शशिकांत शरद गुरव. प्रभाग 3 मधून दीक्षा दिपक गोवरे, समृध्दी विजय सुर्वे, ओंकार संजय कोलते यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नवोदित सर्व सदस्य व सरपंच यांनी विजयोत्सव साजरा केला.

मागील 30 वर्षे शिवसेनेची सत्ता कायम असून यंदाही शिवसेनेचे पॅनल बिनविरोध निवडून आले. त्यामुळे गावामध्ये शिवसेनेचे स्थान बळकट असल्याचे सिद्ध झाले. गावात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विविध विकास कामे यामुळे सलग सातव्यांदा शिवसेनेने बाजी मारही. त्याचबरोबर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पक्ष वाढीसाठी या ठिकाणी घेतलेली मेहनत कामी आली.