
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचे जगभरात चाहते आहे. त्याच्यासारखी स्टाईल आणि बॉडी कॉपी करणे अनेकांना आवडते. परंतु सलमान खानचा डुप्लिकेट पाकिस्तानच्या कराची येथे दिसला आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
सलमान सारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ तेथील एका पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात डुप्लिकेट सलमान कराचीच्या प्रसिद्ध बॉल्टन मार्केमध्ये पार्किगमध्ये असणाऱ्या गाड्या व्यवस्थित करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची उंची, हेअरस्टाईल आणि बॉडी अगदी सलमान सारखी दिसत आहे. हा लपवावा आणि तो दाखवावा इतके साम्य त्यांच्यात दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
Watch: Salman Khan’s lookalike spotted in Karachi.@SherySyed_ @khalid_pk pic.twitter.com/xyqUuNiBfN
— حاجی موسیٰ سوریا (@HajiMoosaSuriya) January 19, 2019





























































