
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात विक्की कौशलने हिंदुस्थानच्या माजी लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा टीझर 13 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात लॉन्च होणार असून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान विश्वचषकाच्या सामन्यात त्याचे स्क्रिनिंग होईल. यासंदर्भात स्टार नेटवर्कशी करार करण्यात आला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.




























































