युट्युब चॅनेलने पसरवल्या अफवा, समांथाने पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री संमाथा आणि पती नागा चैत्यन्यने घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. परंतु संमाथाचे विवाहबाह्य संबंध होते तिला मूल नको हवे होते अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या. आता संमाथांने अशा खोट्या बातम्या पसरवणार्‍या युट्युब चॅनेलला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी संमाथांने एका वकीलालाही नोटीस पाठवली आहे.

सुमन टीव्ही या युट्युब चॅनलने संमांथाच्या घटस्फोटामागचे कारण सांगणारा एक कार्यक्रम केला होता. त्यात संमाथांवर अनेक आरोप करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आतापर्यंत 1 लाख 83 हजार व्ह्युज आहेत. तसेच या कार्यक्रमात जाहिराती दाखवून चॅनेलने पैसेही कमावले होते. आता संमंथाने या चॅनेलविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असून त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच संमाथाने गर्भपात केल्याचे व्यकंट राव या वकीलाने म्हटले होते. संमाथाने त्यांनाही अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.