क्रॉसलूपच्या सीईओपदी समीर काटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रॉसलूप या तंत्रज्ञान व लाइफस्टाईल ब्रॅंडने हिंदुस्थान आणि युरोपमधील आपल्या कामकाजाचे नेतृत्व करण्यासाठी सीईओ पदी समीर काटोले यांची नियुक्ती केली आहे. क्रॉसलूपच्या कामकाजाला चालना देणे आणि विशेष ज्ञान व नैपुण्याचा उपयोग करून संपूर्ण देशभरात अधिक जास्त बळकट विकासाला प्रोत्साहन देणे ही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. ग्राहकोपयोगी टिकाऊ उत्पादने आणि रिटेल उद्योगक्षेत्रात गेली तब्बल 14 वर्षे कार्यरत असलेले समीर यांनी आजवरच्या कारकिर्दीत सेल्स आणि मार्केटशी संबंधित अनेक कामगिऱ्यांमध्ये यश मिळवलेय.