
एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यांच्या वाशी येथील सेक्टर-19मधील सद्गुरू बारचा परवाना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केला आहे. हा परवाना वानखेडे 17 वर्षांचे असताना देण्यात आला होता.
समीर वानखेडे यांचा वाशी येथील सेक्टर-19मध्ये सद्गुरू रेस्टो बार आहे. बारचा परवाना 1997मध्ये त्यांना देण्यात आला त्या वेळी त्यांचे वय फक्त 17 वर्षे होते, असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी केला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. वानखेडे यांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले.































































