न्यायमूर्तींच्या घराबाहेर चोरट्यांची काटछाट, एक कोटीचे झाड चोरले

41

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमधील कोटा शहरातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायमूर्ती किशन गुर्जर यांच्या सरकारी निवासस्थाना बाहेरील चंदनाचे झाडच चोरट्यांनी चोरून नेले आहे. या झाडाची किंमत काळ्या बाजारात अंदाजे एक कोटीच्या घरात असल्याचे समजते.

30 डिसेंबर रोजी किशन गुर्जर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत बाहेर गावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नारायणपूर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या सरकारी निवासस्थानच्या मागच्या बाजूचे चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरले. बुधवारी जेव्हा गुर्जर त्यांच्या निवासस्थानावर परतले तेव्हा त्यांच्या घरामागचे चंदनाचे झाड मुळाच्या थोड्या वर पासून कापलेले होते. तस्करांनी चंदनाची तस्करी करण्यासाठी हे झाड चोरल्याची तक्रार गुर्जर यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींनी झाड कापण्यासाठी मशीनचा वापर केला असल्याची शक्यता कोटाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश मील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या