तुम्हाला धडा शिकवणार! संजय राऊत यांचा फोडाफोडी करणाऱ्यांना इशारा, जो फुटणार त्याच्या मतदारसंघात सभा घेणार, राडा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत व लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी दिल्लीत आज संसदीय मंडळाच्या बैठकीआधी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखा बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘जे फुटणार त्यांना तुडवा’ या आदेशाची आठवण करून दिली. तसेच बेईमानी करणाऱ्यांना आणि फोडाफोडी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवणार, अशा शब्दात खरपूस समचार घेतला. ”आता कुणीही फुटलं तर त्याच्या मतदारसंघात राजकीय राडा होणार, असा कडक इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला.

”जे सारखे बोलतायत की हे तोडणार, ते फोडणार, आता मी त्यांना सांगतो की तोडून दाखवाच. नाही तुम्हाला तोडून दाखवलं तर शिवसेना वडिलांचं नाव सांगणार नाही. आमच्या वडिलांचे नाव बाळासाहेब ठाकरे आहे. काय खेळ चालवलाय लोकशाहीची. याला तोडणार, त्याला तोडणार, असा सज्जड दम संजय राऊत यांनी यावेळी दिला. पुढे ते म्हणाले की, ”ईडी सीबीआयची धमकी कुणाला देताय, आम्ही तुरुंगात जाऊन आलोय, पुन्हा तुरुंगात जायला तयार आहोत पण आता तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ. देशाच्या प्रतिष्ठेसोबत तुम्ही खेळताय. आमच्या पक्षातून लोकं निवडून येतात आणि तुम्ही त्यांना हायजॅक करता. ही कुठली लोकशाही. नरेंद्र मोदी परदेशात जाऊन मोठ्या मोठ्या बाता मारता, त्यांनी देशात पहावं की काय सुरू आहे”

”महाराष्ट्राचा गोलपीठा झालाय हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार खासदार एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात आणि नंतर जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर जातात. ही प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर महाराषट्राच्या परंपरेचा गोलपीठा होईल आणि ते करण्यामागे भाजपचं योगदान आहे. दलाल खूप निर्माण होतात. शिंदे गटाचे हे सगळे जे आहेत ते गोलपिठ्यातले दलालच आहेत. हे दलाल निर्माण करण्याचे काम करून भाजपाने देशाच्या प्रतिमेला काळीमा फासलाय”, असे संजय राऊत म्हणाले.

”आताच उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी फोनवर बोलणे झाले. शरद पवार स्वत: म्हणाले की मी स्वत: त्या फुटलेल्या आमदार खासदाराच्या मतदारसंघात जाऊन सभा घेईन. कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला की त्याला मोकळीक द्यायची नाही. त्याला धडा शिकवायचा”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.