
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे सरकारमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या पक्षांतर्गत बैठकांतून देवेंद्र फडणवीसांसाठी जोर लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, फडणवीस चांगले काम करतात. त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाऊन पेंद्रात नेतृत्व करावे, असा सल्ला दिला.
शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबतची काही लोकं बॅनर लावतात. त्यांना शुभेच्छा आहे; पण माझीही इच्छा आहे की, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत. आणि देवेंद्र फडणवीस इतके चांगले काम करत आहेत. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे. क@पेसिटीचा जो भाग आहे ना तो फडणवीस यांच्याकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटते, त्यांनी तेही नेतृत्व केले पाहिजे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता असून, शिरसाट यांना युतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत समज दिली जाण्याची शक्यता आहे.






















































