जनी म्हणे… महिला दिनानिमित्त संत जनाबाईंना वंदन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संत जनाबाई यांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. शिवगंधारतर्फे शिवगंधर्व पंडित शिवानंद पाटील यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्ताने ‘संतप्रिया’ मालिकेत जनी म्हणे… (पुष्प पहिले) ही भक्तिसंगीत मैफल सादर होणार आहे. रविवार, 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिवानंद ऑफिशियल या यू टय़ूबवर रसिकांना हा भाग बघता येईल. त्यानंतर दर रविवारी ‘जनी म्हणे’ मालिकेचे 12 भाग सादर होतील.

मालिकेची संकल्पना, निर्मिती आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. तरुण पिढीतील गायिका सानिका देवधर आणि स्नेहा काणे यांची स्वरसाथ लाभली आहे. संत जनाबाई यांच्या पूर्वी प्रसिद्ध न झालेल्या आणि नव्याने संगीत दिलेल्या रचना त्या गाणार आहेत. संत जनाबाई यांच्या प्रासादिक रचनेला प्रतिभावंत संगीतकार पंडित यशवंत देव, पंडित प्रभाकर जोग, पंडित केदार पंडित आणि डॉ. सुनील कट्टी यांनी स्वरसाज चढवलेला आहे. संत जनाबाईंच्या जीवनाचा, काव्याचा आणि अभंग गायनाचा त्रिवेणी संगम या मैफलीत आहे. त्याविषयी मुकुंद कुळे आणि प्रा. मीना गोखले निवेदन करतील.

आपली प्रतिक्रिया द्या