सांताक्रुझमध्ये तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलिना परिसरात राहणाऱया 20 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. प्रीती देवी गिरजाशंकर प्रजापती असे तिचे नाव आहे. घडल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

प्रीती ही कलिनाच्या शास्त्र्ााrनगर येथे आई-वडील आणि भावंडांसोबत राहत होती. ती एका खासगी ठिकाणी काम करायची. सोमवारी दुपारी प्रीतीच्या घरचे बाहेर गेले होते. घरात कोणी नसताना प्रीतीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी जेव्हा प्रीतीचे आई-वडील घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेजारच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा प्रीतीने गळफास लावला होता. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच वाकोला पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी प्रीतीच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.