
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ – मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या सरंबळ तळ्याचा बांध पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन व सरंबळ घाडीवाडी रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. गावच्या दृष्टीने महत्वाची कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सरंबळ गावात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. यामध्ये सरंबळ कदमवाडी रस्ता, सरंबळ टेंबवाडी रस्ता, टेंबवाडी जोड रस्ता, साटमवाडी रस्ता, सरंबळ गावात स्ट्रीट लाईट, नेरूर नागदा मंदिर रस्ता आदी कामे करण्यात आली आहेत. गावातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचाही लाभ देण्यात आला आहे. सरंबळ तळ्याच्या बांध पुनर्बांधणी कामानंतर तळ्याच्या सुशोभीकरणासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
भूमीपूजन सोहळ्याला कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सभापती राजन जाधव, विभागप्रमुख शेखर गावडे, सरपंच मनाली साटम, उपसरपंच समीक्षा तोंडवळकर, संतोष पाटील, दिलीप वराडकर, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, शाखाप्रमुख सचिन परब, शाम परब, उपशाखाप्रमुख बाळा जाधव तात्या हळदणकर, धनाजी परब,अनुप नाईक, सचिन कदम, बाळा पावसकर, तुषार परब,माजी उपसरपंच सत्यविजय कदम आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































