
मराठीतील उल्लेखनीय राजकीयपट असलेल्या प्रभावी, पुणे निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘सरकारनामा’च्या प्रदर्शनास आज, रविवारी पंचवीस वर्षे पूर्ण होतायत. या चित्रपटाचे निर्माते विनित गनबोटे आणि अजेय झणकर होते. कथा, पटकथा, संवाद व गीते अजय झणकर यांचीच होती. यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, सुकन्या कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आदींच्या यात प्रमुख भूमिका आहेत. यातील ‘झाकोळलं झाकोळलं ढळलं आभाळ’, ‘अलवार तुझी चाहूल’ ही गाणी लोकप्रिय आहेत.





























































