
माण तालुक्यातील शेनवडी येथे बेकायदेशीर घातक शस्त्र्ाs विकण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर संशयिताकडून पोलिसांनी 2 गावठी कट्टे, 2 राउंैड जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे संशयित गुन्हेगार तडीपार आहे. परशुराम रमेश कुरवले (वय 24, मूळ रा. सोमवार पेठ, कराड, सध्या रा. आटपाडी, जि. सांगली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शेनवडी येथे संशयित घातक शस्त्र्ाs विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी त्यानुसार सापळा लावला असता एक युवक संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासले असता त्याच्याकडे 2 पिस्टल, 2 जिवंत राऊंड व दुचाकी असा 1 लाख 70 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, संशयित परशुराम कुरवले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला सातारा जिह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही शस्त्र्ाs कुठून आली? किती रुपयांना विक्री केली जाणार होती? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
































































