
खून, गुंडगिरी, मारामारी, दरोडा, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱया सातारा जिह्यातील चार गुन्हेगारी टोळ्यांमधील 18 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
आमिर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी, ता. सातारा), आमिर सलीम शेख (वय 19, रा. बनवासवाडी, कृष्णानगर), आकाश हणमंत पवार (वय 20), सौरभ उर्फ गोटय़ा संजय जाधव (वय 20), अभिजित उर्फ आबू राजू भिसे (वय 18, तिघे रा. सैदापूर), जगदीश रामेश्वर मते (वय 20, रा. रांगोळे कॉलनी, शाहुपुरी), शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टोळीचा प्रमुख सागर नागराज गोसावी (वय 23), रवि नीलकंठ घाडगे (वय 25), अर्जुन नागराज गोसावी (वय 35, तिघे रा. यशवंतनगर, सैदापूर), विपुल तानाजी नलवडे (वय 20, रा. बापदंडे कॉलनी, सैदापूर), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 20, रा. सैदापूर), वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीचा प्रमुख रॉकी निवास घाडगे, (वय 29), कृष्णा निवास घाडगे (वय 23), सनी निवास घाडगे (वय 30, सर्व रा. लाखानगर, सोनगीरवाडी, ता. वाई), कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील टोळीचा प्रमुख आशीष अशोक पाडळकर (वय 32) इंद्रजित हणमंत पवार (वय 24), अनिकेत रमेश शेलार (वय 21, सर्व रा. मलकापूर, ता. कराड), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत, ता. कराड) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराडचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक निरीक्षक विजय गोडसे, साताऱयाचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहुपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. के. वायकर, वाईचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी याबाबतचे प्रस्ताव सादर केले होते.




























































