Satish Kaushik सतीश कौशिक यांचा निधनापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, दिल्लीतील पार्टीत नक्की काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. निधनाआधी त्यांनी दिल्लीतील बिजवासन येथील उद्योगपती विकास मालू यांच्या फार्महाऊसवर पार्टी केली होती. या पार्टीनंतरच सतीश कौशिक यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता या पार्टीतील सतीश कौशिक यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

सतीश कौशिक यांच्या अकाली निधनानंतर उद्योगपती विकास मालू हे चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नी त्यांच्यावर सतीस कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. पत्नीचा हा आरोप विकास यांनी फेटाळून लावला असून पार्टीतील एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Satish Kaushik Death माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली, महिलेच्या दाव्याने खळबळ

विकास मालू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सतीश कौशिक बॉलिवूडच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचत असल्याचे दिसतेय. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केल्याचे यात दिसत आहे. हा व्हिडीओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, विकास मालू यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना म्हटले की, सतीश कौशिक आणि माझ्यात गेल्या 30 वर्षापासून कौटुंबीक संबंध असून जगाला माझ्यावर चिखलफेक करण्यास काही मिनिटंही लागली नाहीत. या सुंदर सेलिब्रेशनंतर झालेली शोकांतिका मी सहन करू शकत नाही. मला या आरोपांवर मौन सोडायचे आहे. मला एवढेच सांगायचे आहे की शोकांतिका कधी सांगन येत नाही आणि त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखावा. प्रत्येक उत्सवात मला सतीश यांची आठवण येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Malu (@vmkuber)