एसबीआयचा ग्राहकांना दणका; मुदतठेवीवरील व्याजदरात कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआयने ग्राहकांना दणका दिला आहे. बँकेने मुदत ठेवीवरील (फिक्स डिपॉझिट) व्याजदरात कपात केली आहे. हे नवे व्याजदर 10 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. याआधी बँकेने 27 मे रोजी मुदत ठेवीवरील व्याजदारत कपात केली होती. बँकेने मुदतठेवीवरील व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे.

बँकेत 2 कोटींपर्यंतची रक्कम मुदतठेवीसाठी ठेवणाऱ्या ग्राहकांना 45 दिवसांसाठी 2.90 तर ज्येष्ठ नागरिकांना 3.40 टक्के व्याज मिळणार आहे. 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतठेवीसाठी 3.90 तर ज्येष्ठ नागरिकांना 4.40 टक्के व्याज मिळणार आहे. 180 ते 210 दिवसांच्या मुदतठेवीवर 4.40 तर ज्येष्ठ नागरिकांना 4.90 टक्के व्याज मिळणार आहे. 211 दिवसांपासून एक वर्षापर्यंतच्या मुदतठेवीवर 4.40 तर ज्येष्ठ नागरिकांना 4.90 टक्के व्याज मिळणार आहे. तर एक ते दोन वर्षांच्या मुदतठेवीवर 4.90 तर ज्येष्ठ नागरिकांना 5.40 टक्के व्याज मिळणार आहे. दोन ते तीन वर्षांच्या मुदतठेवीसाठी सर्व ग्राहकांना 5.10 तर ज्येष्ठ नागरिकांना 5.60 टक्के व्याज मिळणार आहे. तीन ते पाच वर्षांच्या मुदतठेवीसाठी 5.3 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.80 टक्के व्याज मिळणार आहे. 5 ते 10 वर्षांच्या मुदतठेवीसाठी 5.40 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.20 टक्के व्याज मिळणार आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एसबीआय वीकेयर डिपॉजिट’ योजना आणली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांना पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या मुदत ठेवीवर 30 अकांचे जास्त प्रिमियम मिळते. या योजनेत गुतंवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत होती. त्यात बँकेने 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.