
पिंपरी–चिंचवड शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून पिंपरी – चिंचवड शहरात पाऊस वाढला आहे. जोरात पाऊस कोसळत आहे. सगळीकडे पाणीच-पाणी झाले आहे. आणखी काही दिवस जोराचा पाऊस राहणार आहे. रेड अलर्टही दिला आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्याअनुषंगाने पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) अशा सर्व शाळांना आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीचा इशारा! पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना आज, उद्या सुट्टी pic.twitter.com/VTimOiZkRa
— Saamana (@SaamanaOnline) July 13, 2022
रायगडमधील शाळाही बंद
रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस पडतोय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शाळांना आज आणि उद्या अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.






























































